नागरिक कर्तव्य व सामाजिक जबाबदारी
समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते.
या योजनांचा लाभ पात्र व गरजू नागरिकांपर्यंत पोहोचावा,यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
मुलगा व मुलगी यांना समान शिक्षणाची संधी देणे,महिलांचा सन्मान राखणे आणि शिक्षणातून सशक्त समाज घडविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
घर, परिसर व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, तसेच पाणी व ऊर्जेचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे, नद्या, नाले व जलस्रोत स्वच्छ ठेवणे आणि त्यामध्ये कचरा किंवा सांडपाणी न टाकणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
गरजू व्यक्तींना मदत करणे, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे आणि सर्व नियमांचे पालन करणे ही चांगल्या सामाजिक जीवनशैलीची ओळख आहे.
जात, धर्म, भाषा किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांशी आदराने वागणे आणि एकोप्याने राहणे आवश्यक आहे.
गावापासून तालुका, जिल्हा, राज्य आणि देशपातळीपर्यंत प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून ती प्रामाणिकपणे पार पाडली,
तर देशाचा सर्वांगीण विकास साध्य होऊन उज्ज्वल भविष्य घडू शकते.